विषाणू

सूने सुने रस्ते आणि शांत पहुडलेले किनारे
जलतरीत कसिनोंचे कुठे गेले नखरे
मासळी बाजारातील कोलाहल कुठे हरवला आज
आणि बंदरावर ऐकू येईना माणसांचा गाज
झाडांवरील पक्षी करत होते आपआपसात गुंजारव
कुठे हरवला धावत्या रंगबिरंगी वाहनांचा आरव
अटल सेतूच्या दिव्यांची रोषणाई आज मंदावली कशी
पौर्णिमेला ही अमवासेची लाज वाटावी जशी
कुठे गेला माणसांनी मांडलेला तो हिरव्या पानांचा बाजार
आणि गडगंज इमारतीतील मॉल नावाचा कारभार
रस्त्यावर एकटाच का मी विचारात होती झाडे
रस्त्यालगत उभे राहून त्यांनाही सुटेना हे कोडे
जगणे म्हणजे सिनेमा आणि भिरभिर फिरणे असे
की रेस्टॉरंट मधल्या सोनेरी क्षणांचे अप्रूप वाटे कसे
आज बदलला नियम सारा बदलले रीतिरिवाज
अस्पृश्य झाला मनुष्य आता स्पर्श ही नको आज
किती करशील प्रयत्न लढण्यास निसर्गाशी फुका
आता तरी कळतील का तुजला तुझ्या अक्षम्य चुका
माणसा रे माणसा नक्की सांग तुझीच ना ही दुनिया
छोट्याशा विषाणूने केली काय बरी ही किमया !

हर्षल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *