हॅश टॅग गो कोरोना


निमित्त झालं ते कोरोना संसर्ग आणि त्यामधून पसरलेल्या गोंधळाच.
एव्हाना हे त्रिकालाबाधित सत्य आहे की कोरोनाने सिद्ध केलंय की सध्याचं आर्थिक मॉडेल हे किती कमकुवत आहे. अशाप्रकारच्या संभाव्य धोका यांचा कोणताही आढावा न घेता आणि त्या साठी आवश्यक कोणतीही यंत्रणा हाती नसताना एक काही मायक्रो मीटरचा विषाणू किती हाहाकार करू शकतो ह्याचा प्रत्यय मानवजातीला येत आहे. त्यातून सावरण्याचा प्रयत्न होईल पण मला असं वाटतं की माणूस आणि त्याची यंत्रणा तिकी हतबल आहे अशी एक छोटीशी झलक आज आपल्याला मिळाली आहे. ह्या विषाणूला कोणता धर्म माहित नाही, कोणत्याही राजकीय सीमा माहिती नाही, गरीब-श्रीमंत हा भेद माहित नाही. एक वेगळाच समतेचा संदेश हा विषाणू देऊ पाहतोय. जागतिक हवाई वाहतूक ठप्प आहे, देवाण घेवाण थांबली आहे आणि जगातील सर्वच मोठी शहरे ओस पडलीत. समतेचा एक आगळा संदेश देत, देशांच्या राजकीय सिमांना न जुमानता ह्या विषाणू प्रचलित व्यवस्थेवर एक सणसणीत चपराक मारलीय. आता गरज आहे ते पुनर्विचार करण्याची.
कोरोना च थैमान चालू असताना अजून संभाव्य धोक्याची चाहूल लागते. मार्च महिना अखेर होत आला असताना थंडीमध्ये काहीही कमी झालेली नाही. पृथ्वीच्या पाठीवर हवामानामध्ये कमालीचे बदल घडून आलेत. ह्याची पुष्टी जागतिक हवामान खात्याकडून होत आहे. गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी ही ह्या बदलाचं एक चिन्ह आहे. आता ह्या बदलत्या वातावरण बरोबर त्याचे संभाव्य दूरगामी परिणाम ही काय असतील हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. जागतिक मंदी ही ह्या सर्व घडामोडीचा आगाऊ परिणाम आहे आणि ह्याचे परिणाम भयावह असू शकतात हे उद्योग जगताला कळून चुकलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *