स्पर्धा माझीच माझ्याशी

असं म्हणतात की आजचे युग स्पर्धेचे आहे. मान्य आहे! स्पर्धा हवीच पण त्या स्पर्धेचा एवढा बाऊ नको की माणसाच अस्तित्वच धोक्यात येईल. आजची पिढी स्पर्धेने एवढी व्याकूळ झाली आहे आहे की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जगण्यासाठी फक्त स्पर्धा, स्पर्धा, आणि स्पर्धा. या स्पर्धेचा विपरीत परिणाम माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. माणसामाणसात दरी निर्माण झाली आहे. प्रत्येक जण एकमेकाशी स्पर्धा करू पाहतात. बायको नवऱ्याशी स्पर्धा करतेय, भावंडं भावंडांमध्ये स्पर्धा करत आहेत, शेजारी शेजाऱ्यांशी, एक राज्य दुसऱ्या राज्य सोबत आणि एक देश दुसऱ्यासोबत स्पर्धा करत आहेत. एक कंपनी दुसरा कंपनीशी स्पर्धा करतेय. त्यामुळे झाले झाले अस की माणूस एकटा पडला आणि एकटा पडल्यामुळे तो बेचैन झाला आहे असुरक्षिततेचे त्याला भंडावून सोडले आहे.
अशा वेळेला असं केलं तर, आपली स्पर्धा आपल्यासोबतच लावली तर! दोन फायदे आहेत, एक तर मला हरण्याची भीती नाही कारण जिंकलो तर मीच करणार आणि जिंकल्यावर तर मी स्वतःला अधिकाधिक बेहतर करण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून माझी क्षमता अधिकाधिक वृद्धिंगत होते जाईल. स्पर्धा स्वतःसोबत हवी, स्वतःमधल्या अवगुणासोबत हवी, स्वतःमधल्या कमजोरी सोबत असावी. असं केलं तर जगण्याला खूप मजा येईल. माणसा माणसाचा दुरावा संपत जाईल आणि प्रत्येक मनुष्य अधिकाधिक शक्तिशाली बनत जाईल. समाज शक्तीशाली बनेल आणि देश ही बलवान होईल. आणि एकंदरीत मानव जातीचा ही उद्धार होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *