वणवा जेव्हा जळत होता

वणवा जेव्हा जळत होता
माणूस काय झोपला होता
कळलं नव्हतं का त्याला
की प्रत्येक ठिणगी मधे
एक वणवा दडलेला असतो
फार झाला आधुनिकतेचा कहर
आणि बेगडी प्रगतीची लहर
जळत आहेत जंगले
आणि बेघर होत आहेत पशुपक्षी
तुमच्या दहा बाय दहाच्या क्युबिकल्सना
थंड करण्यासाठी
तुम्ही पेटवलीत आमची राने
आणि तुमच्या स्टॉक एक्सचेजच्या आलेखासोबत
चढतोय धरणी मातेच्या तापमानाचा पारा
किती पोकळ आहे तुमची स्वप्न
बंगला गाडी आणि बँक बॅलन्स
कधीतरी एक वेळ झाडाच्या सावलीत बसा
आणि फांद्या मधून डोकावणारा सूर्य पहा
जंगलात दडलेल्या पक्षाची केकावली ऐका
आणि वाहणाऱ्या झऱ्यांच सुमधुर संगीत ऐका
विध्वंस केलाय तुम्ही स्वर्गाचा
आणि कोणतं जग बनवू पाहतंय
तुमचा खेळ होतो राव
पण आमचा जीव जातो…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *