किनाऱ्यालगत चे बिझिनेस

 
किनाऱ्यालगत चे बिझनेस इथे चालतात
सोयीसाठी ह्याला टुरिझम म्हणतात
बाटलीच्या स्वस्त द्रव्यात एक किडा वळवळत असतो
भांगेच्या बोंडवराती तो कधी कधी गुणगुणत असतो
खाडीमधल्या बोटी कधी कधी फिशिंग करतात
एरव्ही मात्र माणसांशी त्या बेटिंग करत असतात
सी शोअर चा आमच्या झोपडीमधे रशियन पाहुणे ही येतात
वस्त्र गहाळ होतात त्यांची ते सूर्याचे उन पित बसतात
पराक्रमी किल्यांची फोर्ट हॉटेल्स ही इथे असतात
त्या किल्ल्यांच्या भिंती रोज पिऊन झिंगतात
कधी कधी तिथे झपाटलेली भुते ही आभळा ला पाहून हसत असतात
संस्कृती नाचत असते spiritual hip hop गाण्यावरती
अटल अश्या पुलावराती कधी कधी तुझा सुटतो तोल
रस्त्यावरचे दिवे रेषा होतात आणि रस्ता होई गोल गोल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *